Weather Update | सुरू झाला आहे उन्हाचा तडाका, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या दोन दिवसापासून राज्यातील वातावरणात चांगलाच बदल झाला आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट (Heat Wave) सुरू झाली आहे. फेब्रुवारी महिना सुरू असून गर्मीमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गोवा, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे. या राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. फेब्रुवारी महिन्याचे वातावरण आल्हाददायक होण्याऐवजी अधिकच उष्ण होत चालले आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस वातावरण अधिक उष्ण राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यातील तापमानात वाढ होणार आहे. फेब्रुवारी महिना संपण्याच्या आधीच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. दरम्यान, मुंबईमधून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. कालच्या तुलनेत मुंबईचे तापमान आज 7.6 अंश सेल्सिअसने वाढले आहे. मुंबईतील कमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून (Weather Update) वर्तवण्यात आली आहे.

देशातील तापमानाबद्दल बोलायचे झाले तर, 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेशमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. तर देशातील इतर भागांमध्ये कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 6 ते 12 अंश सेल्सिअस जास्त असू शकते. यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिना अधिक उष्ण असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून (Weather Update) वर्तवण्यात आला आहे.

उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या (Take care of health in summer)

दरम्यान, थंडी संपतात लगेच उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करून शरीर हायड्रेट ठेवा. उन्हाळ्यात लिंबू पाणी, सरबत, ज्यूस इत्यादी गोष्टी प्या. त्याचबरोबर घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेऊनच बाहेर पडा.

महत्वाच्या बातम्या