Santosh Deshmukh | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरुन राजकारण तापलं आहे. बीड जिल्ह्यात संतापाची भावना आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान मूक मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख देखील सहभागी होणार आहे. यासंदर्भात बोलताना वैभवी भावुक झाली .
“माझ्या वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. चार जणांना अटक झाली आहे. आणखी तिघांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. शनिवारी होणाऱ्या मोर्चात मी सहभागी होणार, माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी कुठल्याही मोर्चात सहभागी व्हायला तयार आहे”, असं वैभवी देशमुखने म्हटलं आहे.
“या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे”, अशी मागणीही वैभवी देशमुखने केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “…तर तुम्ही हे खून पचवून ढेकर दिला असता”; संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
- Sanjay Raut। “लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात…”; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
- Shivendraraje Bhosale | “अभयसिंहराजे राष्ट्रवादीत गेले नसते तर कदाचित…”; शिवेंद्रराजे भोसले यांचं परखड मत