Sanjay Raut | बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय.
राहुल गांधी यांचा परभणी दौरा आणि शरद पवार यांच्या बीड, परभणी दौऱ्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी नुसते पर्यटन करू नका, अशी टीका केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, ”पर्यटन करु नका असं तुम्ही म्हणता. मग तुमचे नेते कशाला गेले होते. जर विरोधी पक्षाने हा आवाज उठवला नसता तर तुम्ही हे खून पचवून ढेकर दिला असता.”
पुढे राऊत म्हणाले , “आपण सच्चे गृहमंत्री असाल, तर या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा. त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. बीडमध्ये कोण आहेत? तुमची पोर आहेत की जावई आहेत का? ज्यांना अभय दिलं जातय. बीडमध्ये गेल्या काही वर्षात 38 हत्या झाल्या आहेत. या 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातले बहुतांश वंजारी समाजाचे आहेत.”
“बीडमधील पिस्तुल लायसन्स रद्द करा. 1500 लायसन्स आहेत ती सर्व बिहारमधून आणलेले आहेत. दोन जिल्हे “महाराष्ट्र”णार नाही अस म्हणता मग तुमचे हे जावई आहेत का?”, असा खोचक सवाल त्यांनी केलाय. परळीच्या 118 बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. बंदुकीच्या धाकावर हे मतदान होऊ दिलं नाही,” असा आरोप देखील राऊतांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut। “लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात…”; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
- Shivendraraje Bhosale | “अभयसिंहराजे राष्ट्रवादीत गेले नसते तर कदाचित…”; शिवेंद्रराजे भोसले यांचं परखड मत
- Devendra Fadanvis | ना बीड ना नागपूर? कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं?; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं