Share

Shivendraraje Bhosale | “अभयसिंहराजे राष्ट्रवादीत गेले नसते तर कदाचित…”; शिवेंद्रराजे भोसले यांचं परखड मत

🕒 1 min readShivendraraje Bhosale | कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. शरद पवारांनी माजी दिंवगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला, असा आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. “अभयसिंहराजे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर सातारा जिल्ह्याचा … Read more

Published On: 

Shivendraraje Bhosale | "अभयसिंहराजे राष्ट्रवादीत गेले नसते तर कदाचित..."; शिवेंद्रराजे भोसले यांचं परखड मत

🕒 1 min read

Shivendraraje Bhosale | कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत. शरद पवारांनी माजी दिंवगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला, असा आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे.

“अभयसिंहराजे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर सातारा जिल्ह्याचा विकास वेगळ्या पद्धतीने झाला असता”, असेही ते म्हणाले. शरद पवारांनी अभयसिंहराजे यांना राजकीयदृष्ट्या बाजूला सारल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी माध्यमांशी बोलताना केला. आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील आदींची या वेळी उपस्थिती होती.

“अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते”, असा मोठा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

“अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्मने सीनियर होते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले संयमी नेतृत्व होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नव्हते. मात्र असे असूनही खासदार शरद पवार यांनी त्यांना का बाजूला ठेवले?”, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!