Share

Sanjay Raut। “लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात…”; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल 

Sanjay Raut । "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात..."; राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल 

Sanjay Raut। विधानसभा निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढच्या काळात सुरू राहील की नाही? याबाबत मोठी चर्चा रंगली होती. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात अनेक आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं पाहायला मिळालं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा करण्यास पुन्हा सुरूवात झाली आहे. अशातच संजय राऊतांनी देखील देखील सरकारवर सडकून टीका केली आहे.

लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात असल्याचे आरोप संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत. “परळी आणि आसपासच्या परिसरातील अनेक लाडक्या बहिणींच कुंकू पुसलं गेलेलं आहे. ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. तेव्हा देवा भाऊ, खरोखर त्यांचा भाऊ असेल, तर आपल्या लाडक्या विधवा बहिणींचा कायद्याने बदला घेईल. पण फडणवीस, अजित पवार हे लाडक्या बहिणींच कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्याना संरक्षण देत आहेत”, असा हल्लाबोल राऊतांनी केला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधील नक्षलवाद संपवा, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. दरम्यान, कल्याण (Kalyan Crime) येथील अल्पवयीन मुलीच अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. यावरून देखील संजय राऊतांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय.

कल्याणच्या घटनेवर फडणवीस, श्रीकांत शिंदे गप्प का?

“कल्याण, अंबरनाथ हा उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा जिल्हा आहे. ⁠या जिल्ह्यात लुटमार, बलात्काराचे प्रकार वाढले आहेत. गुंडांना अभय दिलं जातंय. आणि येथील ⁠खासदार मतदारसंघात फिरतही नाहीत. बलात्कार, खून करणारे हे बीड आणि कल्याणमध्येच का असतात? ⁠देवेंद्र फडणवीस आणि ते खासदार गप्प का?”, असा परखड सवाल राऊतांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळात असल्याचे आरोप संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले आहेत.

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now