Share

Sanjay Shirsat | “राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय मला पूर्ण विश्वास”; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर शिरसाटांची प्रतिक्रिया

🕒 1 min readSanjay Shirsat | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | मुंबई : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा पराभव करावा’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा मुख्य चेहरा कोण असेल? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. यावर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहे’, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत असताना शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी या वक्तव्यावरून राऊतांवर टीकास्र सोडलं आहे.

Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut

“संजय राऊत हे रोज काही ना काही नवीन वक्तव्य करत असतात. हा त्यांचा आवडता छंद आहे. उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणारे संजय राऊत कोण आहेत? मुळात संजय राऊत हा एक कारकून आहे. तो काय उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करेल. याबाबत उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे नेते आहेत, ते ठरवतील. मला पूर्ण विश्वास आहे की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच तो नको ती बडबड करतो”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.

संजय राऊत नक्की काय म्हणाले?

“राजकारणात काहीही घडू शकतं. पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, 2024 कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करू…आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात”, असे संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या