Share

“हिंदुत्वाचा अन् वक्फ दुरुस्ती विधेयकाचा काहीच संबंध नाही”; Sanjay Raut यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा 

sanjay raut criticized devendra fadanvis over waqf amendment bill

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण देखील पाहायला मिळालं. दरम्यान, आज (२ एप्रिल) रोजी हे वक्फ विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने वक्फ विधेयक संसदेत मांडण्यासाठी मोठी तयारी केली असल्याचंही बोललं जात आहे. अशातच खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut On Devendra Fadanvis

“शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्व आणि विज्ञानवाद यांना सपोर्ट केला. फडणवीस किंवा त्यांचे बगल बच्चे हे वक्फ बिलाच्या निमित्ताने बांग देतात हा मूर्खपणा आहे”, अशा शब्दात संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. “या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध? हे फडणवीस सांगू शकतील का?”, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

“या विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. उगाच महाराष्ट्र व देशाचं वातावरण बिघडवू नका. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. फडणवीस तसा दावा करत असतील, तर त्यांनी आमची शाळा घ्यावी, आम्ही येऊ. ते जर नवे शंकराचार्य झाले असतील तर त्यांनी आमची शाळा किंवा शिबिरं घ्यावी”, असंही संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

वक़्फ़ सुधारणा विधेयक भाजपाची गोंधळ निर्माण करण्याची एक खाज असल्याचंही संजय राऊत म्हणालेत. “देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्वाची इतकी काळजी आहे, मग विषय आता अल्पसंख्यांकाचा आहे, मुंबईत जैन धर्मीय हिंदुंना जागा नाकारतात. मग त्यासाठी असं एखाद बिलू आणून हिंदुंना जागा नाकारणाऱ्यांवर कारवाई होणार आहे का?”, असा परखड सवाल त्यांनी फडणवीसांना केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sanjay Raut | गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now