Beed Collecter | बीड : अनेक ठिकाणी अजूनही वाळू माफियांची ( Sand Mafia) प्रकरणे समोर येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी वेगवेगळा हतगंडा वापरत असतात. तर आता अशीच एक घटना बीड जिल्ह्यामधून समोर आली आहे. वाळू माफियाचा वाळूचा टिप्पर पकडल्यानंतर थेट जिल्हाधिकारी (Beed Collecter) दीपा मुधोळ (Deepa Mudhol) यांच्या गाडीवर टिप्पर घालून मारण्याचा पर्यत वाळू माफियाने (Sand Mafia) केला आहे. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
वाळू माफियाकडून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना मरण्याचा प्रयत्न
दीपा मुधोळ (Deepa Mudhol) या बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी असून छत्रपती संभाजी नगरहून बीडकडे येताना गेवराईजवळ एक वाळू वाहतूक करणारा टिप्पर दीपा मुधोळ यांच्या दृष्टीस पडला. त्यावेळी त्यांनी त्या टिप्परवर थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु, तो टिप्पर न थांबल्यामुळे मुधोळ (Deepa Mudhol) यांच्या गाडीने टिप्परला ओव्हरटेक केलं. यादरम्यान बराच वेळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर त्या टिप्पर चालकाला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या झटापटीत दीपा मुधोळ यांचे बॉडीगार्ड अंबादास तावणे जखमी झाले आहेत. तर दीपा मुधोळ ( Deepa Mudhol) सुखरुप आहेत.
Sand Mafia Tried To Kill Beed Collector
दरम्यान, या सर्व प्रकारामुळे आता बीड जिल्ह्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. तर एलसीबीकडून टिप्पर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तसचं बीड जिल्ह्यात अजूनही वाळू उपसा केला जात असल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. जखमी झालेल्या अंबादास तावणे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल देखील करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Cyber Crime | पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण?
- Refinery Project | रिफायनरी प्रकल्पावरून बारसुतील स्थानिकांनी केलं सरकारचं श्राद्ध
- Rashtriya Swayamsevak Sangh | राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला- कॉँग्रेस
- Aadhar Card Update | मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत आहे वेळ
- Western Dress | तुळजापूरनंतर पुण्यातील मंदिरात वेस्टर्न कपड्यांना बंदी