Refinery Project | रिफायनरी प्रकल्पावरून बारसुतील स्थानिकांनी केलं सरकारचं श्राद्ध

Refinery Project | रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) चांगलं वातावरण तापलं होत. तर कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध करत आंदोलन केलं होत. यामध्ये सरकार आणि स्थानिक लोकांच्यात बैठक देखील पार पडली. त्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. माती परिक्षणाच काम पोलीस बंदोबस्तात पार पडलं असून त्याचा आवहाल दोन महिन्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु, आज ( 27मे) बारसु सोलगावमधील स्थानिकांनी त्या ठिकाणी सरकारचं श्राद्ध घातलं आहे.

बारसुतील ग्रामस्थांनी घातलं सरकारच श्राद्ध-

ग्रामस्थांनी म्हटलं आहे की, आज आम्ही सरकारच या ठिकाणी पिंडदान करत आहोत. कारण सरकारनं भु- संरक्षण आमचा विरोध असताना देखील केलं म्हणजे सरकारला वाटत आहे की या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प ( Refinery Project) होईल परंतु, आम्ही जिवंत असेपर्यंत आम्ही सरकारचा हा प्रकल्प या ठिकाणी होऊ देणार नाही. इथल्या लोकांनावर फक्त दडपशाही, जबरदस्ती केली जात आहे. आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कलम लावली जात आहेत. याचा आम्ही निषेध करत हे पिंडदान करत आहोत. तसचं जर सरकारनं अशीच दडपशाही चालू ठेवली तर कोकणातील शेतकरी या दोन वर्षात सरकारच खरोखर पिंडदान केल्याशिवाय राहणार नाही. असं स्थानिकांनी म्हटलं आहे.

konkan refinery project-

दरम्यान, या कोकणातील प्रकल्पावरून (Refinery Project) राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर सत्ताधारी सरकारने या प्रकल्पाला पाठिंबा देत हा प्रकल्प होणार असं म्हटलं होत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी देखील या प्रकरणी भाष्य करत म्हटलं होत की, कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्यामुळे तेथील एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नसून महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. ही जागा रिफायनरीसाठी (Refinery Project) योग्य असल्याचं अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं होत. तर विरोधी पक्ष आणि कोकणातील स्थनिकांकडून याला विरोध केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.