BGMI Update | टीम महाराष्ट्र देशा: बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) या लोकप्रिय गेमवरून बंदी उठवण्यात आली आहे. ही बंदी उठवल्यानंतर गेमर्स आनंदी आहे आणि गेम खेळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, हा गेम अद्याप प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. परंतु, लवकरच हा गेम ॲपल प्ले स्टोअर (Apple Play Store) आणि गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल.
The popular game BGMI will again be available on Play Store
BGMI हा गेम अद्याप iOS उपकरणांसाठी उपलब्ध नाही. मात्र, अँड्रॉइड वापरकर्ते हा गेम BGMI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करू शकतात. बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) गेम सध्या प्ले स्टोअरमध्ये दिसत नसला, तरी खेळाडू वेबसाईटच्या लिंकवरून हा गेम खेळू शकतात. मात्र, वेबसाईटवरून हा गेम खेळण्यासाठी अनेक खेळाडूंना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक वापरकर्त्यांनी या गेमबाबत समस्या मांडली. त्यानंतर कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले आहे.
BGMI ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. कंपनीने ट्विट करत वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आजपासून म्हणजेच 27 मे पासून प्री-लोडिंग उपलब्ध असेल. तर अँड्रॉइड आणि iOS स्मार्टफोनवर खेळाडू 29 मे पासून हा गेम खेळू शकतात. 29 मे पासून हा गेम खेळाडू डाऊनलोड करू शकतात.
Hello BGMI Fan!
Your most loved game is now available to preload from today 27th May onwards. Please note, The game will be playable, however, from 29th May onwards
Thanks! #INDIAKABATTLEGROUNDS #BGMI pic.twitter.com/IQeKzgWwl7
— Akshat (@AnshSo007) May 26, 2023
BGMI गेमसाठी भारत सरकारने तीन महिन्यांची तत्पूर्ती मान्यता दिली आहे. या कालावधीमध्ये अधिकारी या खेळावर लक्ष ठेवणार आहे. त्याचबरोबर या खेळाने कोणताही नियम मोडला, तर त्यावर बंदी घालण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या
- IPL 2023 Closing Ceremony | ‘हे’ दिग्गज कलाकार असणार IPL च्या क्लोजिंग सेरेमनीचे आकर्षण
- Indian Railway | भारतीय रेल्वेच्या ‘या’ चुकीमुळे शेतकरी बनला ट्रेनचा मालक; वाचा सविस्तर
- Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे
- Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..