Share

छान साडी घालून बसलो म्हणून नेते होतो; गैरसमजातून…! पाटील यांनी रुपाली चाकणकरांची उडवली खिल्ली

Rupali Chakankar vs Rupali Patil Thombare Deepak Mankar

Rupali Chakankar vs Rupali Thombare : रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने  रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  चाकणकर यांना पक्षातूनच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एक व्यक्ती एक पद नियमानुसार रुपाली चाकणकर यांच्याकडील महिला प्रदेशाध्यक्षपद काढून घ्या, अशी मागणी  रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

यावर रुपाली चाकरणकर यांनी रुपाली ठोंबरे यांना प्रत्युत्तर देत म्हणाल्या की, “एक व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि बाहेरच्या पक्षातून आमच्या पक्षात आलेल्या व्यक्तींना पक्षाची वैचारिक भूमिका माहित नाही, पक्षाची ध्येय धोरण माहित नाहीत. त्यामुळे सातत्याने एकच व्यक्ती टीका करत असेल तर समजून जावं की मानसिकता काय आहे, मला ते फार महत्वाच वाटत नाही, असं प्रत्युत्तर रुपाली चाकणकर यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिले.  

 “राज्यभर काम करत असताना राज्यात संघटना उभी केली. आयोगाचं काम करत असताना आयोगातील काम केलं आहे, त्यामुळे अशा व्यक्तींवर बोलण मला फार उचित वाटत नाही, असंही रुपाली चाकरणकर म्हणाल्या. 

यावरही  रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, त्या म्हणाल्या ”रुपाली चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते. मला नाही वाटत, अशा बाईला उत्तर सारखं द्यावं. कारण की, रुपाली चाकणकरांना लोकांतून निवडून येण्याचा अनुभव कमी आहे. त्यांना असे वाटते की, पक्षाची तत्वे आणि पक्षाचे प्रोटोकॉल, फक्त छान साडी घालून बसलो म्हणून नेते होतो. त्या गैरसमजातून, पूर्वीच्या माझ्या मैत्रिणीने त्यातनं बाहेर यावे. चाकणकरांना वाटतंय पक्ष त्यांच्या माहेरच्यांकडून आंदण आलेला आहे. त्या म्हणतील तसा पक्ष चालेल. तर तसा विषय नाही आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा पक्ष आहे.

दीपक मानकर नाराज

सुनील तटकरे यांनी जेवढी तत्परता रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात दाखवली तसेच त्यांच्याकडे महिला प्रदेश अध्यक्ष पद का? राज्यात त्यांच्यापेक्षा अधिक कर्तुत्ववान महिला आहेत ना, जेवढी रुपाली चाकणकर यांचे पद वाढवून देण्याबाबत तत्परता दाखवली तेवढी माझ्याबाबत का नाही दाखवली नाही? असा सवालही मानकर यांनी केला.

तुम्ही आम्हाला फोन करायचीही तत्परता दाखवली नाही. तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना विचारायला तरी पाहिजे. संघटना चालवायची असेल तर कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे. कार्यकर्त्यांना संघटनेत कधी न्याय मिळणार आहे. छगन भुजबळ यांच्याकडेच सगळच देणार असाल तर तुमच्या कार्यकर्त्यांना कधी ताकद देणार, ताकद दिली नाही तर कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होते, असंही दीपक मानकर म्हणाले. 

मी कुठे कमी पडलो हे दादांनी ( अजित पवार ) सांगावे, असे म्हणत दीपक मानकर यांनी पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

Rupali Chakankar vs Rupali Patil Thombare Deepak Mankar

महत्वाच्या बातम्या

Rupali Chakankar vs Rupali Patil Thombare : रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने  रुपाली पाटील ठोंबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Marathi News Maharashtra Politics Pune

Join WhatsApp

Join Now