Share

“आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही!”; राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात, म्हणाले “हिंमत असेल तर कामं अडवून दाखवाच…”

Raj Thackeray hits back at CM Fadnavis, asserting “We are Hindu, not Hindi” and challenging the BJP to block development works, while insisting Mumbai’s Mayor will be Marathi.

Published On: 

Raj Thackeray, Devendra Fadnavis | BMC

🕒 1 min read

मुंबई– “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही! इथं कसलं हिंदू-मराठी करताय?” थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबईच्या राजकीय आखाड्यात अक्षरशः धुरळा उडवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ‘हिंदू-मराठी’ प्रचाराचा मुद्दा छेडताच राज यांनी त्यांना इतिहासाचे दाखले देत फटकारलं आहे. “पेशव्यांनी बडोद्यात साम्राज्य उभं केलं, पण तिथे महापौर गुजरातीच असतो ना? मग हा तर महाराष्ट्र आहे, इथे महापौर मराठीच होणार,” अशा शब्दांत राज यांनी फडणवीसांच्या मुद्द्याची हवाच काढून टाकली.

“हिंमत असेल तर कामं अडवून दाखवा…”

ठाकरे बंधूंनी जाहीर केलेल्या वचननाम्यावर बोलताना राज आक्रमक झाले. “आम्ही योजना राबवू, पण सरकार परवानगी देणार नसेल, तर त्यांनी आमची कामं अडवूनच दाखवावीत,” असा उघड गर्भित इशारा त्यांनी दिला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही मध्येच हस्तक्षेप करत, “यांना कामं अडवू द्याच, म्हणजे यांचं विकासाचं ढोंग जनतेसमोर येईल,” असा टोला लगावला.

“सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही,” हे विसरू नका. आज तुम्ही जे चुकीचे पायंडे पाडत आहात, ते उद्या तुमच्यावरच दामदुपटीने उलटतील, तेव्हा रडगाणं गाऊ नका, असा सज्जड दम राज यांनी सत्ताधाऱ्यांना भरला.

महाराष्ट्राचं ‘युपी-बिहार’ करताय का?

बिनविरोध निवडणुकांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला कोंडीत पकडलं. “पश्चिम बंगालमध्ये जेव्हा हेच घडत होतं, तेव्हा भाजप सुप्रीम कोर्टात गेला होता. मग आता महाराष्ट्रात तुमची भूमिका काय?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राचं ‘युपी-बिहार’ करण्याचा घाट घातला जात असून, राज्याचं हे वाटोळं खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही