Pankaja Munde | वरळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला आहे. आज पत्रकार परिषद घेत पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुशांत सिंग राजपूत प्रकरणांमध्ये आधी कोणत्याही प्रकारचे ठोस पुरावे नव्हते. मात्र, आता काही लोकांकडे ठोस पुरावे आहेत. सध्या त्या पुराव्यांची सखोल तपासणी सुरू आहे. मात्र, या मुद्द्यांवर मी आता नाही तर योग्य वेळ आल्यानंतर बोलेल.” देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, “एखादी महत्त्वाची माहिती एखादा मोठा व्यक्ती लपवून ठेवत असेल तर तो मोठा गुन्हा आहे. जर कुणी एखाद्या पदावर विराजमान असेल आणि त्या व्यक्तीकडे महत्त्वाची माहिती असेल, जी समाजासाठी खूप महत्त्वाची आहे. त्याबद्दल त्यांनी कारवाई कारवाई हवी. त्या व्यक्तींनं ती माहिती लपवून ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टी बघून मी अत्यंत दुःखी आहे.”
I will not go anywhere except BJP – Pankaja Munde
पुढे बोलताना त्या (Pankaja Munde) म्हणाल्या, “मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. मी पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. मी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना कधीच भेटलेले नाही. मी काँग्रेसमध्ये जाणार या चर्चा फक्त माझं राजकीय करियर संपवण्यासाठी सुरू आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | दगाबाजी! शरद पवारांना समर्थन करणारे आमदार अजित पवारांसोबत
- Vijay Wadettiwar | पंकजाताई काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचं स्वागत करू – विजय वडेट्टीवार
- Nikhil Wagle | मराठी माणसाचे पक्ष फोडण्यासाठी मोदी-शहा यांनी मराठी माणसाचाच वापर केला – निखिल वागळे
- Dhananjay Munde | आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण भावाचे नाते कायम अबाधित; धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Sanjay Raut | अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकतं – संजय राऊत