Dhananjay Munde | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) पुन्हा एकदा एकत्र आले आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना औक्षण करताना दिसत आहे.
Dhananjay Munde’s tweet about Pankaja Munde
ट्विट करत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, “राज्याच्या मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर माझ्या भगिनी तथा भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईने माझे औक्षण केले आणि शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण-भावाचे नाते कायम अबाधित आहे.”
राज्याच्या मंत्री पदी नियुक्ती नंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव @Pankajamunde ताईने माझे औक्षण केले व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे. pic.twitter.com/4WY9t6dBCK
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 7, 2023
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेअर केलेला हा भावा बहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओनंतर राजकीय वर्तुळ चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, आज दुपारी 12.30 वाजता पंकजा मुंडे माध्यमांशी संवाद साधणार आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. पंकजा मुंडे यांची ही पत्रकार परिषद त्यांच्या वरळी येथील कार्यालयात होणार आहे. पंकजा मुंडे या पत्रकार परिषदेमध्ये (Dhananjay Munde) काय बोलतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मी 12:30 वाजता press घेईन..स्थळ माझे वरळी येथील कार्यालय …पत्ता आपल्याकडे आहेच…
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 7, 2023
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकतं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विधान परिषदेतील आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Sharad Pawar | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवार म्हणतात…
- Amol Mitkari | कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका! अमोल मिटकरी यांच्या नावाची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे आता थेट तुरुंगात; एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंना झाप झाप झापलं