Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विधान परिषदेतील आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात वाद सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट यांच्यात वाद सुरू असताना उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार आहे. ठाकरे गटातील विधान परिषदेचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

A trusted leader of Uddhav Thackeray will join the Shinde group today

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विश्वासू नेता आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती एबीपी माझानं दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा नेता शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हा नेता विधान परिषदेचा आमदार आहे. हा आमदार आज दुपारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद दिवसेंदिवस दिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आणखी एक विधान परिषदेचा आमदार शिंदे गटात येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्ती राहुल कनाल (Rahul Kanal) यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरे गटातील (Uddhav Thackeray) नेते शिंदे गटात सहभागी होत आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही