Amol Mitkari | कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका! अमोल मिटकरी यांच्या नावाची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद

Amol Mitkari | मुंबई: 02 जुलै रोजी राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप आला होता. तेव्हापासून राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या दिवशी अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह 30 आमदार सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

Congress leaders have registered the name of Amol Mitkari in a psychiatric hospital

अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), सुनील तटकरे (Sunil Tatkare), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), अमोल मिटकरी (Amol Mitkari) इत्यादी नेते भाजपमध्ये सामील झाले आहे. यावरून अमोल मिटकरी यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं आहे. अमोल मिटकरी यांच्या नावाची काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनोरुग्णालयात नोंद केली आहे. अमोल मिटकरी यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

05 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार गट (Amol Mitkari) आणि शरद पवार गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या भूमिकेवर अमोल मिटकरी (Amol Mitkari) काय उत्तर देतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांची नावाची मनोरुग्णालयात नोंदणी केल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.