Eknath Shinde | उद्धव ठाकरे आता थेट तुरुंगात; एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंना झाप झाप झापलं

Eknath Shinde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडानंतर राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. या घटनेनंतर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं होतं. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं शंभूराज देसाई म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विधानावरून शंभूराजे देसाई यांना चांगलचं सुनावलं आहे.

What will you get by going to Uddhav Thackeray? – Eknath Shinde

अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गट अस्वस्थ झाला असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शंभूराज देसाई यांच्या विधानाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ते आता अडचणीत सापडले आहे. त्यामुळे ते आता थेट तुरुंगात जाणार. उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन तुम्हाला काय मिळणार? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधत असताना शंभूराजे देसाई म्हणाले, “आम्ही सादला प्रतिसाद देऊ. मात्र, त्यांच्याकडून (उद्धव ठाकरे) आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला (Eknath Shinde) नाही. परंतु प्रस्ताव आल्यावर आम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करू शकतो.”

“राजकारणामध्ये कोणी कोणासमोर प्रस्ताव मांडला तर आपण एकदम त्याला नाही (Eknath Shinde) म्हणत नाही. आपण त्यांना विचार करू असं सांगतो. सध्या विचार करणारा मी एकटा नाही. सध्या विचार करणारे अनेक नेते आहे. आपल्याला महाविकास आघाडी नको, असं आम्ही त्यावेळी म्हणत होतो. त्यानंतर अडीच वर्षात जे झालं त्याला आपण दुरुस्त करू असंही आम्ही म्हटलं होतं आणि आजही आम्ही तेचं म्हणत आहोत. त्यामुळे आमच्यासमोर प्रस्ताव मांडला तर आम्ही त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ,” असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.