Sharad Pawar | दिल्ली: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेले बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांच्या भेटीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Will Uddhav Thackeray and Raj Thackeray come together?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी (Sharad Pawar) तीन शब्दात हसत प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर ती चांगली गोष्ट आहे, असं शरद पवार हसत म्हणाले आहे.
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “2024 मध्ये महाराष्ट्रातील सत्ता बदलेल, याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. सध्या सत्तेवर असणाऱ्यांना लोक सत्तेपासून दूर नेतील. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांसोबत जे केलं आहे, त्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.”
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार नसल्याचं भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी म्हटलं आहे. “उद्धव ठाकरेंनी आयुष्यात स्वतःच्या कुटुंबाला नीट सांभाळलं नाही. त्यांनी कधी त्यांच्या वडिलांच्या विचारांना किंमत दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रस्तावाला भिक सुद्धा जाणार नाही”, अस नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Amol Mitkari | कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका! अमोल मिटकरी यांच्या नावाची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद
- Eknath Shinde | उद्धव ठाकरे आता थेट तुरुंगात; एकनाथ शिंदेंनी शंभूराज देसाईंना झाप झाप झापलं
- Bacchu Kadu | “भाजपसोबत जाऊन चुक…”; बच्चू कडूंचं खळबळजनक वक्तव्य
- Sanjay Shirsat | अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे BJP आमदारांमध्ये नाराजी – संजय शिरसाट
- Nitesh Rane | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं शक्य नाही – नितेश राणे