Sanjay Raut | अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकतं – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: रविवारी (2 जुलै) अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांसह शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

Some people of Shinde group are in touch with us – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे गटाचे काही लोक आमच्या संपर्कात आहे. आमच्या समोर ते त्यांच्या व्यथा मांडत असतात. आम्ही त्या ऐकून घेतो. ते आमचे जुने सहकारी असल्यामुळे आम्ही ऐकून घेण्याचं काम करतो. अजित पवार कुठे जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकत.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले,”अजित पवार आज जर महाविकास आघाडीमध्ये असते, तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला असता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केलं पाहिजे अजित पवार खरे की ईडी खरी.”

“राज ठाकरे यांच्यासोबत बोलायला आम्हाला मध्यस्थीची गरज नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) भाऊ आहेत, त्यामुळे त्यांना बोलण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही. माझी आणि राज ठाकरेंची मैत्री सर्वांना माहित आहे. राज ठाकरे आणि आमचं एक वेगळं भावनिक नातं आहे, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.