Nikhil Wagle | टीम महाराष्ट्र देशा: वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जे केलं होतं, तेच 02 जुलै रोजी अजित पवारांनी (Ajit Pawar) केलं आहे. गेल्या वर्षी एकनाथ शिंदे शिवसेनासोडून भाजपसोबत गेले होते. त्यानंतर शिवसेना फुटली. तर अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचेही दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहांवर (Amit Shah) खोचक टीका केली आहे.
Two parties have split in Maharashtra
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात दोन पक्ष फुटले आहे. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समावेश आहे. यावरून निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर निखिल वागळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
ट्विट करत निखिल वागळे (Nikhil Wagle) म्हणाले, “मराठी माणसाचे दोन पक्ष मोदी शहा यांनी फोडले. त्यासाठी एका मराठी माणसाचाच वापर केला!” निखिल वागळे यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मराठी माणसाचे दोन पक्ष मोदी शहा यांनी फोडले. त्यासाठी एका
मराठी माणसाचाच वापर केला!#Modi #AmitShah #MaharashtraPoliticalCrisis— nikhil wagle (@waglenikhil) July 7, 2023
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर भाजपवर विरोधकांकडून सडेतोड टीका केली जात आहे. भाजप महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचं अनेकांनी (Nikhil Wagle) म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde | आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण भावाचे नाते कायम अबाधित; धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Sanjay Raut | अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकतं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विधान परिषदेतील आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Sharad Pawar | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवार म्हणतात…
- Amol Mitkari | कार्यकर्त्यांची टोकाची भूमिका! अमोल मिटकरी यांच्या नावाची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद