Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: दोन जुलै रोजी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाले. या घटनेनंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करू. पंकजा मुंडे यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधीजींची भेट घेतली आहे, असं आम्ही ऐकलं आहे. पंकजा मुंडे आल्यानं काँग्रेस मजबूत होईल. पंकजा मुंडे त्यांच्या शब्दाच्या पक्क्या आहेत. त्यामुळे त्या पक्षात आल्या तर पक्ष मजबूत होईल.”
Will Pankaja Munde join Congress?
या प्रकरणावर नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या या वक्तव्यानंतर पंकजा मुंडे खरंच काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, आज दुपारी 12.30 वाजता पंकजा मुंडे पत्रकार परिषद घेणार आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे यांची ही पत्रकार परिषद पार (Vijay Wadettiwar) पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nikhil Wagle | मराठी माणसाचे पक्ष फोडण्यासाठी मोदी-शहा यांनी मराठी माणसाचाच वापर केला – निखिल वागळे
- Dhananjay Munde | आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर बहीण भावाचे नाते कायम अबाधित; धनंजय मुंडेंचं ‘ते’ ट्विट चर्चेत
- Sanjay Raut | अजित पवार कुठेही जाऊ शकतात तर कोणीही कुठेही जाऊ शकतं – संजय राऊत
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! विधान परिषदेतील आमदार करणार शिंदे गटात प्रवेश
- Sharad Pawar | राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवार म्हणतात…