🕒 1 min read
पाकिस्तानने भारतावर सुरू केलेल्या सायबर हल्ल्यांतर्गत भारतीय जनता पक्ष (BJP), सीमा सुरक्षा दल (BSF), आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्यासह अनेक प्रमुख सरकारी आणि संस्थात्मक वेबसाइट्स हॅक केल्याची माहिती पाकमधील शासकीय प्रसारमाध्यम PTV News ने दिली आहे.
हॅक झालेल्या इतर वेबसाइट्समध्ये क्राइम रिसर्च इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, महानगर टेलिकॉम कंपनी लिमिटेड, भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड, ऑल इंडिया नेव्हल टेक्निकल सुपरवायझरी स्टाफ असोसिएशन, आणि युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) यांचा समावेश आहे.
PTV News च्या अहवालानुसार, “डेटा लीक झालेल्या संस्थांमध्ये भारतीय हवाई दल, महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि इतर काही महत्वाच्या यंत्रणा आहेत.” इतकेच नव्हे तर २५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे देखील हॅक झाल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
✅ FACT CHECK: पाकिस्तानचा भारतीय वेबसाइट हॅकिंगचा दावा खोटा
पाकिस्तानमधील शासकीय प्रसारमाध्यम PTV News ने केलेल्या दाव्यानुसार भारतातील BJP, BSF, HAL, UIDAI यांच्यासह अनेक महत्त्वाच्या वेबसाइट्स हॅक केल्या गेल्या आहेत. तथापि, महाराष्ट्र देशाने या सर्व वेबसाइट्सना भेट दिल्यानंतर असे स्पष्ट झाले की या सर्व वेबसाइट्स सुरळीत चालू आहेत आणि कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. ( No evidence of Indian websites being hacked, contrary to Pakistan’s false claims )
त्यानुसार, पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोट्या पोस्ट्स आणि चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. यामुळे त्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवण्याआधी पडताळणी करणे अत्यावश्यक आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारत-पाक तणावात अमेरिकेचा हस्तक्षेप; मार्को रुबियो आणि जनरल मुनिर यांच्यात चर्चा
- ड्रोन पाडलं असतं, तर पाकिस्तानचं संरक्षण उघड पडलं असतं; ख्वाजा आसिफचा खोटारडेपणा उघड?
- भारत फेक न्यूजचा कारखाना झाला आहे; पाकिस्तानचा भारतीय मीडियावर मोठा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now