Share

ड्रोन पाडलं असतं, तर पाकिस्तानचं संरक्षण उघड पडलं असतं; ख्वाजा आसिफचा खोटारडेपणा उघड?

Pakistan Defence Minister Khawaja Asif says drones weren’t downed to avoid revealing air defence positions, contradicting previous military claims.

Published On: 

Pakistan Defence Minister Khawaja Asif says drones weren't downed to avoid revealing air defence positions, contradicting previous military claims.

इस्लामाबाद | वृत्तसंस्था – पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी संसदेत दिलेल्या निवेदनात सांगितलं की, भारताकडून पाठवण्यात आलेले ड्रोन पाडण्यात आले नाहीत कारण ते पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणांच्या ठिकाणांचा माग काढण्यासाठी पाठवण्यात आले होते.

“हे एक तांत्रिक प्रकरण आहे. आम्ही त्या ड्रोनना पाडलं असतं, तर आमच्या लष्करी संरक्षण यंत्रणांची स्थानं उघड झाली असती,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या विधानामुळे पाकिस्तानमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आसिफ यांच्यावर टीका झाली आहे.

Khawaja Asif Says Indian Drones Not Shot Down

आसिफ यांच्या या विधानामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा रंगली आहे. कारण याआधी पाकिस्तानच्या ISPR (Inter-Services Public Relations) ने दावा केला होता की त्यांनी भारताचे अनेक ड्रोन पाडले आहेत. यामुळे पाकिस्तान सरकारच्या संरक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या विधानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यात ते संसदेत हे सांगताना दिसत आहेत. हे वक्तव्य आधीच्या लष्करी दाव्यांशी विसंगत असल्याने पाकिस्तानमध्येही राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही