Share

भारत-पाक तणावात अमेरिकेचा हस्तक्षेप; मार्को रुबियो आणि जनरल मुनिर यांच्यात चर्चा

US Secretary of State Marco Rubio spoke to Pakistan’s Army Chief Gen Asim Munir and offered US support to help de-escalate tensions between India and Pakistan.

Published On: 

Marco Rubio Offers US Help to De-escalate India-Pakistan Conflict

वॉशिंग्टन – भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी फोनवर संवाद साधला. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी अमेरिका सहकार्य करायला तयार असल्याचं त्यांनी या चर्चेत स्पष्ट केलं, अशी माहिती स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिली.

या चर्चेदरम्यान रुबियो यांनी दोन्ही देशांनी संयम राखावा आणि यापुढे संघर्ष टाळण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू कराव्यात, असं सुचवलं. अमेरिकेच्या वतीने त्यांनी संवादाची मध्यस्थी करण्याचा प्रस्तावही दिला आहे.

Marco Rubio Offers US Help to De-escalate India-Pakistan Conflict

भारत-पाक दरम्यान सध्या वाढता संघर्ष, ड्रोन हल्ले आणि सीमावर्ती भागातील चकमकी यामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा हस्तक्षेप महत्त्वाचा मानला जात आहे.

संघर्ष वाढवू नका – चीन परराष्ट्र मंत्रालय

“आम्ही भारत आणि पाकिस्तान या दोन्ही शेजारी राष्ट्रांना शांतता आणि स्थैर्याला प्राधान्य देण्याचे, संयम राखण्याचे, आणि शांततामूलक राजकीय संवादाच्या मार्गावर परतण्याचे जोरदार आवाहन करतो,” असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

चीनच्या निवेदनामध्ये सांगण्यात आले की, “संघर्ष टाळण्यासाठी आणि परिस्थिती अधिक बिघडू नये यासाठी दोन्ही पक्षांनी सावध आणि जबाबदार पावले उचलली पाहिजेत.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही