Narayan Rane | “मी भाजपमध्ये आलो अन् अडचणीत सापडलो”; फडणवीसांसमोरच नारायण राणेंचं खळबळजनक वक्तव्य

Narayan rane | सिंधदुर्ग : आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnvis ) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एक वक्तव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राणे आणि ठाकरे कुटुंबाचा वाद काही नवा नाही. नारायण राणे ( Sanjay Raut vs Narayan Rane ) आंगणेवाडी येथे बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे.

शिवसेना खरी वाढली कोकणामधून. आम्ही शिवसेनेसाठी कष्ट उपसले. उद्धव ठाकरेंनी काय केलं? असा सवाल उपस्थित करुन राणे म्हणाले की, त्यांनी साधी अंगणवाडी बांधली नाही. कोकणामध्ये आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला मात्र विरोध केला” असे म्हणत नारायण राणेंनी ( Narayan Rane VS Uddhav Thackeray ) पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

Narayan Rane Comment On Uddhav Thackeray 

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, “या जिल्ह्यात मला 33 वर्षे पूर्ण झाली. या जिल्ह्यात माझा जन्म झाला, पण माझं कार्यक्षेत्र मुंबई. 90 साली आलो आणि तेव्हापासून मी या जिल्ह्यात काम करतोय. शिवसेनेतून सुरूवात झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपत आहे. आता हे शेवटचं, यानंतर कोणताही पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो, शंभर टक्के असतो.” “हा जिल्हा विकास करेल, पण कपाळ करंटे मध्ये मध्ये येतात. त्यांना विचार की काय केलं? रस्त्यासाठी काय केलं, शिक्षणासाठी काय केलं, रोजगारासाठी काय केलं? अडीच वर्षात काय केलं?”, असा सवाल करत राणेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.

उद्धव ठाकरेंचे दोन डब्बे बंद झाले ( Narayan rane slams uddhav thackeray and sanjay Raut )

राणेंचा खोचक सवाल “56 वर्षे झाली शिवसेनेला. पहिल्या 45 वर्षांमध्ये साहेब असेपर्यंत… शिवसेना घडायला, वाढायला कोकणाने आधार दिला. मी म्हणत नाही नारायण राणे. महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात वणवण फिरणारे कोकणी होते. मग उद्धवा, अडीच वर्षात काय केलं? आलास दोनदा मासे खायला. डबे कुठून जातात मला माहितीये. त्यातील दोन डब्बे बंद झाले. काय दिलं?”, असा खोचक सवाल राणे यांनी ठाकरेंना केला.

I came to BJP and found myself in trouble – Narayan Rane 

“माझ्यावर टीका केली जात आहे. मी सहन करतोय तोपर्यंत ठीकय. एकदा का मी बोलायला लागलो तर सगळंच बाहेर काढेन. त्यांना इथं राहताही येणार नाही. मी भाजपमध्ये आलो हीच अडचण झाली. कारण इथं सहनशील आणि शांत विचारसरणीचे लोक आहेत. त्यामुळे आपणंही तसं दाखवायला पाहिजे म्हणून शांत आहे”, असं वक्तव्य नारायण राणेंनी केल्याने सर्वांनी तोंडात बोटं घातली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) म्हणायला आवडत नाही, पण म्हणावं लागतं. ( Narayan Rane says i don’t like to called Devendra Fadnavis as Deputy Chief Minister )

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.