Share

Amol Mitkari | “फडणवीस तांबेंना गोंजरण्याचं काम करत असले तरी…”; अमोल मिटकरींची भाजपवर बोचरी टीका

Amol Mitkari | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या सुरवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपकडून अनेकदा खुली ऑफर मिळाली. त्यावरुन भाजप आणि विरोधकांमध्ये कलगितुरा रंगला होता.

भाजपकडून आणि देवेंद्र फडणवीसांकडून सत्यजीत तांबेंना भाजपमध्ये येण्यासाठी साद घातली जात आहे. त्यावरुन विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. त्यातच आज सत्यजीत तांबेंनी काँग्रेस सोडली नसून अपक्ष म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे.

“सत्यजीत तांबेनी अपक्ष राहण्याचा घेतलेला निर्णय भाजपला गुदगुल्या झाल्यासारखा आहे. सत्यजीत तांबे यांना गोंजारण्याचे प्रामाणिक काम देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडून होत असले तरी सत्यजीत तांबेंनी सस्पेन्स कायम ठेवला आहे. तांबे घराणं हे भाजप विरोधी आहे व सद्या तरी भाजपची गत “बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना”, असे अमोल मिटकरी म्हणाले आहेत. याबाबत अमोल मिटकरींनी ट्वीट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Amol Mitkari | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. या निवडणुकीच्या सुरवातीपासूनच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. काँग्रेसमध्ये बंडखोरी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics