Maharashtra Political Crisis | शरद पवारांच्या सांगण्यावरून नरहरी झिरवळ गायब? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narahari Ziraval) गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहे का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

सत्ता संघर्षाच्या निकालावर झिरवळ यांनी काल प्रतिक्रिया दिली होती. प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय घेतला तरी न्यायालय 16 आमदारांना अपात्र ठरवणार आहे किंवा तो निर्णय माझ्याकडे आला तर ते 16 आमदार अपात्र ठरतील.” अशात आज नरहर झिरवळ नॉटरिचेबल असल्याच्या चर्चा सुरू आहे. झिरवळ नॉट रिचेबल असल्याचे प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंत म्हणाले, “झिरवळ नॉट रिचेबल आहे ते आम्हाला कसं कळणार? काल त्यांनी जे वक्तव्य केलं, ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल आधी योग्य आहे की अयोग्य आहे? जबाबदार पदावरील व्यक्तींना असं म्हणणं की 16 जणांचे प्रकरण माझ्याकडे आलं तर मी त्यांना अपात्र ठरवणार, हे योग्य नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार यांनी हे झिरवळ साहेबांच्या लक्षात आणून दिलं असेल. म्हणून ते कदाचित गायब झाले असतील.”

महत्वाच्या बातम्या