Maharashtra Political Crisis | शिंदेगटातील 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार; वाचा अपात्र आमदारांची यादी

Supreme Court Result | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde) बंड केला आणि महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलली. भाजप (BJP) आणि शिंदे अस सरकार स्थापन देखील झालं. परंतु अजूनही सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) राज्याच्या सत्तासंघर्षाचा खटला सुरूच आहे.  याबाबत अनेक सूनावण्या देखील करण्यात आल्या पण अजूनही निकाल लागला नाही. यामुळे सर्वांचं लक्ष आता अपात्र 16 आमदारांच्या निकालाकडे आहे. तर आता उद्या (11मे) घटनापीठाकडून अंतिम निकाल देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. निकाल कोणाच्या बाजूने लागणार? 16 आमदारांचं निलंबन होणार का? उद्धव ठाकरेंना दिलासा मिळणार ? जसं ठाकरेंच्या हातून पक्षाचं चिन्ह गेलं तसचं हा निकालही हातातून जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसचं सुप्रीम कोर्टातुन येणाऱ्या निकालामुळे निलंबनाची टांगती तलवार एकनाथ शिंदेंसह “या” १६ आमदारांचं काय होणार ? याबद्दलही चर्चना उधाण आलं आहे.

अपात्रतेची टांगती तलवार “या” 16 आमदारांवर 

मीडिया रिपोर्टनुसार नुकतीच 16 आमदारांची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील , भरत गोगावले, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर
ल, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर या 16 आमदारांची यादी समोर आली आहे . जर सुप्रीम कोर्टाने या 16 आमदारांना अपात्र ठरवलं तर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळणार आहेत. याबाबत कोर्टात वेगवेगळ्या मुद्द्यावर युक्तिवाद देखील करण्यात आला होता. शिंदे आणि ठाकरे गटांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.

(disqualification hangs over “these” 16 MLA)

दरम्यान, शिंदे – ठाकरे गटाकडून वकिलांची मोठी फौज मैदानात उतरली होती. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत व ए. ए. तिवारी यांनी युक्तीवाद केला तर शिंदे गटाकडून हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी आणि अधिवक्ता अभिकल्प प्रताप सिंह यांनी युक्तिवाद केला होता. तसचं राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी करणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी. एस. नरसिम्हा यांचा समावेश करण्यात आला होता. यामुळे आता ही लढाई शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपली आहे. सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा असून राज्याचचं नाही तर देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.