Jayant Patil | आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीचे नोटीस

Jayant Patil | मुंबई : आज (11 मे) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा सुप्रीम कोर्टातून निकाल जाहीर होणार आहे. यामुळे सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस पाठवलं आहे. यामुळे येत्या सोमवारी (15 मे) त्यांना हजर राहण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

“या” प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीच नोटीस 

तसचं आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठविण्यात आलं आहे. आयएफ आणि एफएस या कंपनीच्या व्यवहाराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. तर आर्थिक गैरव्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.  यामध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता होती.  यात मनी लॉंडिंग झालं आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तर चौकशी दरम्यान अनेक नावे समोर आली होती. यामध्ये जयंत पाटील याचं देखील नाव आहे.  या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावलं असल्याची माहिती समोर आली आहे. तर ILFS प्रकरणात सर्वात आधी दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती बघून हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आलं होतं.

(ED notice to Jayant Patil in “this” case)

दरम्यान, याआधी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना ईडीचं नोटीस आलं आहे. यामध्ये अजित पवार, अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ हे देखील यापूर्वी केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. तर आता जयंत पाटील यांना ईडीच नोटीस आलं असून ईडीच्या नोटीसनंतर जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर हि भाजपची खेळी असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यानंकडून सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.