Share

मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार

Manoj Jarange | मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

मनोज जरांगे म्हणाले “आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला.

पुढे बोलताना जरांगे यांनी मराठा उमेदवारांना विनंती केली की, सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे,” असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange Maharashtra Vidhan Sabha Election 2024

महत्वाच्या बातम्या

Manoj Jarange | मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी कोणत्या …

पुढे वाचा

Chhatrapati Sambhajinagar Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now