Maharashtra Political Crisis | सत्ता संघर्षाच्या गोंधळात फडणवीस मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा

Maharashtra Political Crisis | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय काही तासांमध्ये जाहीर केला जाणार आहे. या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या गोंधळात ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’ अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सत्ता संघर्षावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. बोलताना ते म्हणाले, “सत्ता संघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरून बाजूला होतील. त्याचबरोबर राहिलेल्यांना भाजपसोबत मंत्रीपदाची संधी मिळून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.” दिलीप मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या निकालाचे वाचन करणार आहे. सत्ता संघर्षाचा निर्णय राजकारण्यांना हवा तसा असू शकतो किंवा हुकूमशाहीला छेद करणारा हा निकाल ठरू शकतो, असं देखील दिलीप मोहिते पाटील म्हणाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर आलेला असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहर झिरवळ गायब झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहे. झिरवळ नॉट रिचेबल असून ते अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. झिरवळ शरद पवार यांच्या सांगण्यावरून नॉट रिचेबल झाले आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या