Share

६५ वर्षीय शेतकऱ्याने मशागतीसाठी स्वतःलाच जुंपले औताला , कृषी क्षेत्रातील भीषण वास्तव उघड

A 65-year-old farmer from Latur, Maharashtra, resorted to plowing his field manually due to unaffordable farming expenses.

Published On: 

A 65-year-old farmer from Latur, Maharashtra,

लातूर: “शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू” असं सरकार एकीकडे म्हणत असताना, महाराष्ट्रातील एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचं वास्तव मात्र काळजाला चटका लावणारं आहे. लातूर जिल्ह्यातील हाडोळती गावात, शेतीच्या मशागतीचा खर्च परवडत नसल्याने अंबादास गोविंद पवार ( Latur farmer ) या वृद्ध शेतकऱ्याने अक्षरशः बैलाच्या जागी स्वतःलाच औताला जुंपून शेती कसली आहे. कृषीप्रधान देशातील ही स्थिती नक्कीच चिंताजनक आहे.

हाडोळती गावातील अंबादास गोविंद पवार यांच्याकडे अडीच एकर कोरडवाहू शेती आहे. ६५ वर्षांचे अंबादास पवार गेल्या सात ते आठ वर्षांपासून याच पद्धतीने शेती कसतात. यावर्षी शरीर थकलं असलं तरी, नशिबी आलेली कष्टाची कामं काही संपत नाहीत. पेरणीपूर्व मशागत, पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, खतं यांचा वाढलेला खर्च त्यांना परवडत नाही. ट्रॅक्टर किंवा बैलाने नांगरणी करण्यासाठी दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये लागतात, जे त्यांच्याकडे ( Latur farmer ) नाहीत.

Latur Farmer Plows Field Himself

त्यामुळे नाइलाजास्तव ते आणि त्यांची ६० वर्षांची पत्नी स्वतःच शेतात राबतात. नातवांच्या शिक्षणासाठी त्यांना हे कष्ट करावे लागत आहेत. त्यांची एक मुलगी विवाहित असून, मुलगा पुण्यात मिळेल ते काम करतो.

शेतीतल्या वाढत्या खर्चासोबतच, शेतमालाला नसलेला योग्य भाव, बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमती, मजुरीचा वाढता दर यामुळे शेतकऱ्याची चांगलीच दमछाक होतेय. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा आणि दुसरीकडे शेतीबाबतच्या धोरणांमधील अनास्था, यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे बिघडून गेलं आहे. आधुनिक महाराष्ट्रासाठी हे चित्र नक्कीच आशादायक नाही, उलट ते कृषीप्रधान देशासमोरील भीषण वास्तव अधोरेखित करतं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या