Himachal Pradesh Guide | फिरायला जाण्याची प्लॅनिंग करत असाल, तर ‘ही’ ठिकाण करा एक्सप्लोर

Himachal Pradesh Guide | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. बहुतांश लोकांना या ऋतूमध्ये फिरायला आवडते. कारण या ऋतूमध्ये फिरण्यासाठी सर्वोत्तम हवामान असते. त्यामुळे तुम्ही पण कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही आकर्षक जागांबद्दल माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही आनंदात तुमची सुट्टी साजरी करू शकतात.

कुफरी

हिमाचल प्रदेशमध्ये कुफरी हे एक सुंदर ठिकाण आहे. ट्रेकिंग आणि हायकिंगसाठी ही जागा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला हिमालय पर्वताचे उत्कृष्ट नजारे बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही शांततेत तुमची सुट्टी घालवू शकतात.

मनाली

हिमाचल प्रदेशमध्ये स्थित असलेल्या मनालीला देशातीलच नाही तर परदेशातील पर्यटकही भेट देण्यास येतात. मनालीमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत फिरायला जाऊ शकतात. हे ठिकाण सर्व प्रकारच्या पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग इत्यादी गोष्टींचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात. मनालीमध्ये तुम्ही तुमची सुट्टी मजेत घालवू शकतात.

शिमला

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला हे देशातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. शिमला शहराचे सौंदर्य जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही हायकींग आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत शिमला ट्रिप प्लॅन करू शकतात.

मॅक्लॉडगंज

मॅक्लॉडगंज हे हिमाचल प्रदेशमधील अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी तुम्हाला भारतीय आणि तिबेटी संस्कृतीचे मिश्रण बघायला मिळेल. या ठिकाणी तुम्हाला कॅफे, स्वादिष्ट पाककृती आणि सुंदर दऱ्या इत्यादी गोष्टी बघायला मिळतील. हिमाचल प्रदेशमधील मॅक्लॉडगंज हे ठिकाण अतिशय सुंदर आणि शांत आहे.

महत्वाच्या बातम्या