Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी, आजच करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँक (Indian Bank) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीनुसार पात्रताधारक उमेदवार या पदांसाठी आजपासूनच अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 203 रिक्त जागा (203 vacancies of various posts)

इंडियन बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 203 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करताना सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 850 रुपये फी भरावी लागणार आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. इंडियन बँकेच्या या भरती मोहिमेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.indianbank.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/16v3SApUMOzdqhx7rzNVEvfYvr8gwDwgG/view

महत्वाच्या बातम्या