Job Opportunity | आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकार नेहमी विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात. केंद्र सरकारच्या या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकार नेहमी विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात आर्मी ऑर्डिनन्स कॉर्प्स यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

केंद्र सरकारच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) तब्बल 1793 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ट्रेड्समन मेट पदाच्या 1249 आणि फायरमन पदाच्या 544 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्ष दरम्यान असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.aocrecruitment.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही