Chennai Super Kings | चेन्नई सुपर किंग्ज सर्वात मजबूत संघ; धोनीची सर्वात मोठी खेळी

IPL 2024 Chennai Super Kings The strongest team

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 Chennai Super Kings । चेन्नई सुपर किंग्स (CSK) चा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मोठी खेळी केली आहे. धोनीने योग्य किमतीत दर्जेदार खेळाडू विकत घेतले आहेत. २०२३ च्या ODI विश्वचषकात मोठी कामगिरी केलेल्या अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता होती. परंतु चेन्नई सुपर किंग्सने (CSK) त्याला केवळ 1.8 कोटी रुपयांमध्ये संघात सामील करून घेतले.

चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आगामी इंडियन प्रीमियर लीग IPL 2024 सीझनसाठी 8 दिग्गज परदेशी खेळाडूंचा समावेश केला आहे. १७ भारतीय आणि ८ परदेशी खेळाडू मिळून २५ खेळाडूंचा मजबूत संघ तयार केला आहे. या २५ खेळांडूतून प्लेयिंग ११ निवडणे धोनीला सोपे जाणार आहे.

दुबईत झालेल्या लिलावात सीएसके सर्वात समाधानी फ्रँचायझींपैकी एक म्हणून उदयास आली आहे. ज्याने योग्य किमतीत दर्जेदार खेळाडू मिळवले. रचिन रवींद्र 1.8 कोटी, शार्दुल ठाकूरला 4 कोटी, डॅरिल मिशेल 14 कोटी आणि प्रतिभा समीर रिझवी 8.4 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले आहे.

अंबाती रायडू निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा डॅरिल मिशेल घेणार आहे. तो मधल्या फळीत आपल्याला फलंदाजी करताना दिसणार आहे. सलामी साठी पुण्याचा रुतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे असणार आहेत. रचिन रवींद्रला सुरुवातीचे स्थान मिळणे जरा कठीण आहे. तो क्रमांक ३ वर फलंदाजी करतांना दिसू शकेल.

चेन्नई सुपर किंग्समध्ये यांच्या बरोबरीलाच आक्रमक फलंदाज अजिंक्य रहाणे, शिवम दुबे आणि समीर रिझवी हे दिग्गज खेळाडू असणार आहेत. अजिंक्य रहाणे, शिवम दुबे फिरकी गोलंदाजीला चांगल्या प्रकारे खेळतात.

गोलंदाजी मध्ये शार्दुल ठाकूर, मथेशा पाथिराना, दीपक चहर आणि रवींद्र जडेजा हे दिग्गज खेळाडू चेन्नई सुपर किंग्सकडे आहेत.

Chennai Super Kings Playing XI for IPL 2024

रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (c/wk), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, महीश थीकशाना, मथीशा पाथिराना.

All About Chennai Super Kings IPL Team । CSK IPL Stats

  • चेन्नई सुपर किंग्सकडे (CSK) 5 आयपीएल ट्रॉफी आहेत. ( IPL ट्रॉफी वर्ष – 2010, 2011, 2018, 2021, 2023)
  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) आतापर्यन्त 10 फायनल सामने खेळाला आहे. कोणताही संघाला अशी कामगिरी करता आलेली नाही. सातत्य आणि दबावाखाली कामगिरी करण्याची क्षमता CSK कडे आहे.
  • चेन्नई सुपर किंग्स (CSK) 12 वेळा प्लेऑफ पात्र झाले आहेत, केवळ दोनदाच ते प्लेऑफ मधून बाहेर पडले.
  • 194 सामन्यांमध्ये 121 वेळा विजय चेन्नई सुपर किंग्सने मिळवला आहे.
  • एमएस धोनी: CSK साठी सर्वाधिक सामने कर्णधार (200) आणि सर्वाधिक झेल (175)
  • रवींद्र जडेजा: IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा आणि सर्वाधिक पर्पल कॅप्स (५) विजेता.

महत्वाच्या बातम्या