IND Vs SA | रोहित शर्माची डोकेदुखी वाढली; संघातील स्टार फलंदाज दुखापतग्रस्त

IND Vs SA : Ruturaj Gaikwad ruled out of Test series

IND Vs SA | दक्षिण आफ्रिके ( IND Vs SA Test series ) विरुद्ध भारत टेस्ट सीरीजला  26  डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

तीन सामन्यांच्या टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. तर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकत इतिहास रचला. आता दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तर दुसरीकडे विराट कोहली (Virat Kohli) कौटुंबिक इमर्जन्सीमुळे भारतात परतल्याच बोलल जातय.  विराट कोहली 3 दिवसांपूर्वी मुंबईत आलाय.

ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 19 डिसेंबर रोजी खेळण्यात आलेल्या दुसऱ्या ODI मध्ये दुखापत झाली होती. ऋतुराजच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली यातून तो पूर्णपणे बरा झालेला नाही.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami ) याआधीच कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. विश्वचषक स्पर्धेत शमीने 24 विकेट घेतल्या आहेत. पण फिटनेसमुळे बीसीसीआयने शमीला कसोटी मालिकेत खेळण्यास अनुमती दिली नाही. तसेच विकेटकिपर-फलंदाज ईशान किशनही वैयक्तिक कारणामुळे कसोटी मालिकेत खेळणार नाही आहे.

विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, मोहम्मद शमी आणि ईशान किशन संघात नसल्याने रोहित शर्माची ( Rohit sharma ) डोकेदुखी वाढली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये कॅप्टन रोहित शर्माचा रेकॉर्ड खराब आहे. ( IND Vs SA Test series )

IND Vs SA Test Series Squads

भारताचा कसोटी संघ :  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.

दक्षिण आफ्रिका कसोटी संघ : टेम्बा बावुमा (C), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी झोर्झी, डीन एल्गर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स आणि काइल वेरेन

India Vs South Africa: Test series Schedule

पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबरला सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 ते 7  जानेवारीत केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

India Vs South Africa Test Series Live Streaming Details 

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे भारतात थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर IND Vs SA Test Series सामन्यांचे  Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.