IND vs SA | रोहित शर्माची पनवती काही जाईना; रोहितला अजून एक मोठा धक्का!

SA vs IND: Virat Kohli returns to India due to family

IND vs SA |  वर्ल्ड कप 2023 मध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारतीय संघाने सलग ११ सामन्यात विजय मिळवला होता परंतु अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड कप अंतिम सामना बघायला आल्यामुळे भारतीय संघ पराभूत झाल्याची टीका समाज माध्यमातून उमटून आल्या तसेच अंतिम सामना हा मुंबईत का नाही खेळवला? खेळात राजकारण करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर झाला.

रोहित शर्मा तसेच भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सामना बघायला आल्यामुळे पनवती ( पनौती ) लागल्याचे विरोधकांनी होते.

दरम्यान, रोहित शर्माला खरंच पनवती ( पनौती ) लागली का? हा प्रश्न अनुत्तरित असला तरी दक्षिण आफ्रिके विरुद्ध ( IND vs SA ) होणाऱ्या टेस्ट सीरीज मधून विराट कोहली माघारी परतला आहे. कौटुंबिक इमर्जन्सीमुळे विराट भारतात परतल्याच बोलल जातय.  विराट कोहली 3 दिवसांपूर्वी मुंबईत आलाय. टीम इंडियाच्या इंट्रा-स्क्वाडमध्ये सुद्धा विराट सहभागी झाला नव्हता.

विराटच्या माघारी येण्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने 51 पेक्षा जास्त सरासरीने 719 धावा केल्यात. यात दोन शतक आहेत. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकही टेस्ट सीरीज जिंकलेली नाही. विराटचा फॉर्म बघता तो दक्षिण आफ्रिकेमध्ये चांगली कामगिरी करू शकला असता. यावेळी टेस्ट सीरीज जिंकण्याची संधी भारतीय संघाला मिळाली असती.

दक्षिण आफ्रिके ( IND vs SA ) विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये कॅप्टन रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप खराब आहे. त्यामुळे विराटवर जास्त जबाबदारी तसेच संघात महत्त्वाची भूमिका होती.

पहिला कसोटी सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत सेंच्युरियन येथे तर दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीपासून केपटाऊन येथे खेळला जाणार आहे.

India Vs South Africa Test Series Live Streaming Details

स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे भारतात थेट प्रक्षेपण होईल. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्यांचे Live Streaming तुम्ही पाहू शकाल.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.