Section 144 : मुंबईत येत्या 18 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू; मराठा आंदोलक आक्रमक होणार?

Section 144 : Prohibition in effect till January 18 in Mumbai

Section 144 In Mumbai : मुंबईत १८ जानेवारी २०२४ पर्यंत कलम 144 लागू करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी हा आदेश २० डिसेंबर २०२३ पासून लागू केला आहे. शहारातील कायदे आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जमावबंदी लागू करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

१८ जानेवारी २०२४ पर्यंत कलम 144 लागू असणार आहे. म्हणजेच मुंबई  शहरात पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्रित जमण्यास बंदी असणार आहे.

मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, जमावबंदीदरम्यान शहरात सार्वजनिक सभा, लाऊड स्पीकर, बॅण्ड वाजवणे आणि फटाखे फोडण्यास बंदी असणार आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

या गोष्टींसाठी असणार बंदी

  1. लाऊड स्पीकर, बॅण्ड वाजवणे आणि फटाके फोडण्यास बंदी
  2. पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यास बंदी
  3. सभा आणि आंदोलनावर बंदी
  4. न्यायलये, शासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आसपास नागरिकांना गर्दी करण्यास बंदी
  5. सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी किंवा निदर्शने करण्यासही बंदी

सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा आंदोलक मुंबईत येऊ शकतात त्यांना थांबवण्यासाठी हा आदेश काढल्याचे बोलले जात आहे. पण पोलिसांनी शहारातील कायदे आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव जमावबंदी लागू केल्याचे सांगितले आहे.

३१ डिसेंबरला आता काही दिवसच शिल्लक आहेत. अनेक ठिकाणी पार्ट्यांचे नियोजन केल्याचे दिसून येत आहे. कलम 144 ३१ डिसेंबरला लागू राहणार का ? याबाबत काही स्पष्टता आलेली नाही.

Mumbai Section 144 Impacts Schools and Colleges?

मुंबईतील कलम 144 चा शाळा आणि महाविद्यालयांवर परिणाम होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्व शैक्षणिक संस्था निर्धारित वेळा आणि वेळापत्रकानुसार काम करतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.