Eknath shinde | राज्यात अवकाळी पावसाचं थैमान तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बळीराजाला दिलासा; म्हणाले…

Eknath shinde | मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे बळीराजाच्या पिकांचं मोठ्या प्रमाण नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत. गेल्या 48 तासात राज्यात  तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. अहमदनगर, अकोला, नाशिक, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांना पाऊस आणि गारपीटीने झोडपल असल्याने गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल आहे. तर राज्यातील इतर भागातही पावासाचा जोरदार फटका पिकांना बसला आहे.

दुसरीकडे अवकाळीच्या नुकसानीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आयोध्या दौऱ्याला टार्गेट केलं आहे. तर अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हटलं आहे की, मी आयोध्यातूनच अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश दिले आहेत. तर काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालं असल्याने  सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याची भरपाई केली जाईल.

दरम्यान, राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय. तसचं गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलं आहे. अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांना दिलासा देत सरकार पाठीशी उभं असल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-