Gopichand Padlkar | “राऊत पिसाळलेला माणूस, शिवसेनेची राखरांगोळी केली”; गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

Gopichand Padlkar | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

 “राऊत हा पिसाळलेला माणूस, शिवसेनेची राखरांगोळी केली”

“विधिमंडळाबाबत अशा प्रकारे बोलणं हा लोकशाहीचा अपमान आहे. संजय राऊत हा पिसाळलेला माणूस आहे. त्यांनी संपूर्ण शिवसेनेची राखरांगोळी केली, तरीही त्यांचं समाधान झालेलं नाही. इतकं सगळं झाल्यानंतरही हा माणूस शांत बसत नाही. अशी वक्तव्य करून त्यांना नेमकं काय साध्य करायचं आहे, हे राऊतांनाच विचारलं पाहिजे”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Gopichand Padlkar criticize Sanjay Raut

“संजय राऊत हे रोज खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करतात. आज त्यांनी लोकशाहीचं पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबाबत चुकीचं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना योग्य वेळी उत्तर देईल”, असेही ते म्हणाले आहेत.

हक्कभंग कारवाईची मागणी

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांविरोधात हक्कभंगांची कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिलं आहे. “संजय राऊत यांनी विधिमंडळाचा अपमान करणारे उद्गार काढले आहेत. त्यांनी विधिमंडळाला थेट चोरमंडळ म्हटलं आहे. त्यामुळे राऊतांविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासंदर्भात मी पत्र दिलं आहे”, अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली.

“हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं”

“त्यामुळेच सगळ्यांचा रोष त्याच्यावर आहे. सभागृहात एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही. आज तातडीने त्यांच्यावर एआयआर नोंदवला गेला पाहिजे होता आणि अटक झाली पाहिजे होती. आम्ही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही बोललो. त्यांनाही सांगितलं की, यांची पोलीस सुरक्षा काढून घ्या. पोलीस सुरक्षेत हा बडबड करतो आणि स्वतःला शिवसैनिक म्हणतो. हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं”, असं खुलं आव्हान शिरसाट यांनी राऊतांना दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.