Girish Mahajan । बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडल्याची चर्चा आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांकडूनही भाष्य करण्यात आलं आहे.
याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही.” दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावर संजय राऊत यांनीदेखील वक्तव्य केलंय. “बीडमधील पिस्तुल लायसन्स रद्द करा. 1500 लायसन्स आहेत ती सर्व बिहारमधून आणलेले आहेत. दोन जिल्हे “महाराष्ट्र”णार नाही अस म्हणता मग तुमचे हे जावई आहेत का?”, असा खोचक सवाल त्यांनी केलाय. परळीच्या 118 बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही. बंदुकीच्या धाकावर हे मतदान होऊ दिलं नाही,” असा आरोप देखील राऊतांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :