Dhananjay Munde। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. खंडणी मारामारी आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराडचं काय झालं? याबाबतही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे विरोधक धनंजय मुंडेंनाही यावरून लक्ष्य करत आहेत. आज कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. याचबरोबर या प्रकरणात माझ्या जवळचा कोणी असेल तर त्यालाही सोडून नका, असे ते म्हटले आहेत.
धनंजय मुंडे म्हणाले, “ते शेवटी माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच होते. मलाही त्यांच्याबाबतीत तेवढाच आदर आहे. जे कोणी गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कोणाच्याही जवळचा असो. अगदी माझ्या जवळचा असेल तर त्यालाही सोडायचे नाही, माझ्यावर आरोप करण्यामागे काय राजकारण असेल हे आपण समजू शकता.”
महत्वाच्या बातम्या :