Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु असतानाच राज्यातही संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड कोणीही असला तरी त्याला शिक्षा होईल. तसेच मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटलं आहे.
अशातच आता बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात गौप्यस्फोट केले आहेत. तुम्ही नाव का घेत नाही, तुमच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न सुरेश धस (Suresh Dhas) यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी गंभीर आरोप केले आहेत .
ते म्हणाले, “मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहेत. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, हे मला शंभर टक्के वाटतं.”
“फडणवीस यांनी जोर लावलेला आहे. आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा आहे. लोकांमध्ये असंतोष झाला आहे. याला आमचे साहेब माफ करतील असं नाही. फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ठरवलंय, त्यामुळे आका ताब्यात यावा ही मागणी आहे,” असंही सुरेश धस माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :