Eknath Shinde | आम्ही घरी बसणारे मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Eknath Shinde | रत्नागिरी : आज (25 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तर महाराष्ट्र सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. विविध योजनांचा माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हातभार लावणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) हल्लाबोल केला आहे.

आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) म्हणाले, जेव्हापासून आमचं सरकार सत्तेत आलं आहे. तेव्हापासून आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे ३५० निर्णय घेतले आहेत. ते सरकार सर्वसामान्य जनतेच आणि शेतकऱ्याचं सरकार आहे. “आम्ही घरात बसणारे मुख्यमंत्री नाही, तर बाहेर पडून काम करणारे मुख्यमंत्री आहोत”. अशा शब्दांत ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसचं सरकारी काम आणि सहा महिने थांब ही परिस्थिती आम्हाला थांबवायची आहे. सर्वांनी बघितलं असेल गेल्या अडीच वर्षातील कारभार कसा होता. असा टोला देखील शिंदेंनी ठाकरेंना ( Uddhav Thackeray) लगावला आहे.

Eknath Shinde Commented On uddhav Thackeray

दरम्यान, आता कोणालाही सरकारी कामासाठी चकरा, खेटे घालावे लागणार नाहीत. कारण आम्ही आधीचे स्पीडब्रेकर काढून टाकले. आता गाडी सुसाट चालणार आहे. आम्ही ऑनलाईन काम करत नाही तर थेट फिल्डवर्क करतो. असं शिदें ( Eknath Shinde) म्हणाले. याचप्रमाणे जे काही बाळासाहेबचे आणि दिघे साहेबांचे विचार आहेत, त्याची शिकवणी आहे ती आम्ही आचारणात आणून काम करत आहोत. यामुळे अडीच वर्षात ज्यांनी घरात बसून काम केल म्हणतात, तशी कामं आम्ही करणार नाही, तर प्रत्येक्ष 24 तास फिल्डवर फिरून काम करत आहोत. अस देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-