Sanjay Shirsat | भाजपच्या आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडं लागलं आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस सरकारमधील अनेक मंत्र्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Sanjay Shirsat targets BJP MLAs

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. भाजप आमदारांमुळे मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर झाला आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत त्यांच्या अंतर्गत काय सुरू आहे? मला नाही माहित.”

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “वरळी मतदारसंघाचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे काही अधिकारी आहेत. त्यांनी कोट्यावधींची बिलं उचलली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्या ठिकाणी एकही काम झालेलं नाही.”

यावेळी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील टीकास्त्र चालवलं आहे. ते म्हणाले, “संजय राऊत हा दररोजचा भोंगा आहे. त्याचबरोबर तो एक नालायक माणूस आहे. त्याच्यावर काय बोलायचं.”

महत्वाच्या बातम्या