Walmik Karad । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडची विविध शहरांत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता असल्याचा आरोप होत आहे. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत तब्बल 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा केला जात आहे.
यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. करोडो रुपयांची संपत्ती खरेदी करण्यासाठी वाल्मिक कराडकडे पैसे कुठून आले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच आता याप्रकरणी ईडीची एंट्री होऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. ईडीने (ED) कारवाई केली तर त्याला खूप मोठा धक्का बसू शकतो.
Walmik Karad Property
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला सोडून अटक केलेल्या सर्व आरोपींवर मोक्का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाल्मिक कराडवर मोक्काअंतर्गत कारवाई का झाली नाही?, असा सवाल उपस्थित करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. तब्बल चार तासानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
महत्त्वाच्या बातम्या :