Carom Seeds | ओव्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Carom Seeds | टीम महाराष्ट्र देशा: जवळपास प्रत्येक भारतीय घरामध्ये ओवा वापरला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी ओव्याचा वापर केला जातो. ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व आढळून येतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्ही ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे पाणी कोमट झाल्यावर त्याचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (The digestive system remains healthy-Carom Seeds)

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. या समस्यांवर मात करण्यासाठी ओव्याचे पाणी उपयुक्त ठरू शकते. ओव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्टता, ऍसिडिटी यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

डायबिटीस नियंत्रणात राहते (Diabetes remains under control-Carom Seeds)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी ओव्याच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. डायबिटीसच्या रुग्णांनी जेवणानंतर ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तुम्ही जर डायबेटीसचे रुग्ण असाल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकतात.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Carom Seeds)

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल, तर ओव्याचे पाणी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय ठरू शकते. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवन केल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते.

ओव्याच्या पाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते (Immunity is strengthened-Bel Patra Benefits)

सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहू शकते. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. बेलपत्राचे सेवन तुम्ही केल्याने सर्दी, खोकला इत्यादी मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

पोटासाठी फायदेशीर (Beneficial for stomach-Bel Patra Benefits)

बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्याने गॅस, एसिडिटी, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकतो. त्याचबरोबर मुळव्याधाची समस्या असलेल्यांसाठी बेलपत्र खूप फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.