Devendra Fadnavis | “काळा पैसा जमा करून…”; नोटबंदी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | नागपूर: रिझर्व बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांची नोट चलनातून काढून टाकली आहे. त्याचबरोबर 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आदेश रिझर्व बँकेने दिले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत (Sanjay Raut), अजित पवार (Ajit Pawar), राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नोटबंदीवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Devendra Fadnavis’ reaction on demonetisation)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “दोन हजार रुपयाची नोट बेकायदेशीर ठरली म्हणून ती वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कायदेशीर नोटा असतील किंवा ज्यांच्याकडे पांढरा पैसा आहे त्यांना कुणालाही चिंता करायची गरज नाही. मात्र, ज्यांनी काळा पैसा साठवून ठेवला असेल, त्यांच्यासाठी ही चिंताजनक बाब आहे. कारण त्यांना इतक्या नोटा कुठून आल्या? हे सांगावं लागणार आहे.

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “मागच्या वेळी नोट बंदीचा निर्णय घेऊन जो फायदा झाला होता, तो यावेळी होणार आहे. ज्यांनी नोटा जमा करून ठेवल्या असतील त्यांचा तपास याच्या माध्यमातून लागणार आहे. त्याचबरोबर जे लोक फेक करन्सी पुश करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यावर आळा बसणार आहे.”

नोटबंदीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया (Sanjay Raut’s reaction on demonetisation)

दरम्यान, नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, “गाजावाजा करत दोन हजाराची नोट बाजारात आणली होती. आता ती बंद केली आहे.” मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे, असा गंभीर आरोप देखील संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.