Nana Patole | दिल्ली: राज्यातील राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात. अशात काँग्रेस नेत्यांनी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी हायकमांडकडे धाव घेतली आहे.
Demand to remove Nana Patole from the post of state president
नाना पटोले (Nana Patole) यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे केली आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), सुनील केदार (Sunil Kedar), संजय निरुपम (Sanjay Nirupam) आणि शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) या नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत वाद वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे. जर महाराष्ट्रातील काँग्रेसचं चित्र बदलायचं असेल तर नाना पटोले (Nana Patole) यांच्या जागी नवा चेहरा हवा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले (Nana Patole) यांचीतील वाद काही कमी होत नसताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले यांना हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?
- Weather Update | हवामान खात्याने दिली मान्सूनबद्दल मोठी अपडेट! जाणून घ्या
- Nana Patole | ‘भावी मुख्यमंत्री नाना पटोले’ या बॅनरबाजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया ; म्हणाले…
- Gautam Gambhir IPL 2023 | व्हायरल फोटोवर युजर्स म्हणतात गौतम गंभीरची होऊ शकते हकालपट्टी
- Sudhir Mungantiwar | शिवसेनेचे 40 आमदार फुटतात, ठाकरेंचा काहीतरी दोष असेल ना? – सुधीर मुनगंटीवार